सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार
विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था भंडाराच्या वतीने वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी व एजंट यांच्या पाल्याने मार्च २०२२ मध्ये वर्ग दहावी मध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थीनींनीचा संस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनगंगा पतसंस्थेचे संस्थापक श्री धनंजय दलाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सौ अपर्णा दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष दलाल होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुमारी आनंदी धनराज भुते ९७.४% स्प्रिंग डेल स्कूल भंडारा , चिरंजीव निखिल रवींद्र टोपरे ८७ % स्कूल ऑफ स्कॉलर भंडारा व कुमारी महक राजेंद्र खोब्रागडे यांचा स्मृती चिंह व गुलदस्ता देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थींनींनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने जग जिंकायची तयारी सुरु ठेवावी. आणि मिळालेल्या संधीचे सोने करावे. जेणेकरून आई-वडिलांना ताट मनाने आपल्या पाल्यांचा अभिमान होईल. व नाव उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन वैनगंगा पतसंस्थेचे संस्थापक श्री धनंजय दलाल यांनी केले. तसेच
उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार आशिष दलाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सर्व कर्मचारी व पालकवर्गांनी सहकार्य केले.