चित्रकला, वाघ चेहरा रंगवा, वाघ संदेश, वाघ मुखवटा बनवा स्पर्धां यशस्वी
विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या ‘जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब’तर्फे ‘जागतिक वाघ दिना’च्या प्रित्यर्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण विकास संघटनाचे संस्थाध्यक्ष विद्या कटकवार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य रामकृष्ण हारगुडे, पुष्पा बोरकर , विठ्ठल सुकारे, बी.एस.लंजे, निसर्गमित्र युवराज बोबडे, गोविंदा धुर्वे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना राष्ट्रीय हरित सेना ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी वाघवर्गीय प्राण्यांबद्दल माहिती देऊन जागतिक वाघ दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. यानंतर वाघ चेहरा रंगवा, वाघ मुखवटा बनवा, वाघ संदेश लिहा तसेच ‘जंगलातील वाघ’ या विषयावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सर्पमित्र युवराज बोबडे, गोविंद धुर्वे, यश तिडके, सौरभ राऊत यांनी स्पर्धेचे नियम सांगून स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेण्याकरिता प्रोत्साहित केले. हायस्कुल गटात ‘वाघ चेहरा रंगवा’स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा बहेकार, अथर्व बहेकार यांना देण्यात आला. मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक नंदिनी बावणे, विधी टेंभरे यांना तर द्वितीय क्रमांक भुवी सपाटे, जान्हवी मेश्राम, पूर्वा बहेकार, अनिरुद्ध बंड यांना प्राप्त झाला. तृतीय क्रमांक आयुष मासुरकर, हर्षल चुटे यांना प्राप्त झाला.
वाघ मुखवटा बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा बहेकार व प्राप्ती कनपटे यांना तर द्वितीय क्रमांक भैरवी बोरकर, रिबा पठाण यांना प्राप्त झाला. तृतीय क्रमांक दिव्या राऊत, गुंजन घरत, अथर्व बहेकार यांना प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक वैदवी दोनोडे, प्रतिक्षा कापगते, लांची कापगते, ग्रेशी टेंभरे, कोमल लांजेवार यांना देण्यात आला.
टायगर संदेश स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रेशी टेंभरे, पूर्वा बहेकार यांना तर कोमल लांजेवारला द्वितीय व गुंजन घरत ला तृतीय क्रमांक देण्यात आला. टायगर चित्रकला स्पर्धेत तौकिर शेख याला प्रथम तर द्वितीय क्रमांक फैजान शेख याला व तृतीय क्रमांक लक्ष्मी धकाते, आयुष मासुरकर यांना प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक रिबा पठाण, वैभवी कटनकर, हर्षल चुटे, जान्हवी शेंडे, दिव्या राऊत यांना देण्यात आला. चारही स्पर्धेचे परीक्षण तसेच उपक्रमास सहकार्य प्रा.जागेश्वर तिडके, पुष्पा बोरकर, शिवपाल चन्ने, विठ्ठल सुकारें, हरिश्चंद्र सोनवाने, शिवदास लांजेवार, प्रा.शीतल साहू, प्रा.ज्ञानेश्वर लांजेवार, अनुराधा रणदिवे, निलिमा बोरकर तसेच इतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. यानंतर पर्यावरणस्नेही नागपंचमीच्या निमित्ताने सहभागी स्पर्धकांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्पमित्र यूवराज बोबडे, यश तिडके, गोविंदा धुर्वे, सौरभ राऊत, रितीक शोरी, आदित्य सोनकुसरे इत्यादी जणांनी नुकतेच पकडले विषारी-बिनविषारी साप विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्या मनातील भीती,अंधश्रद्धा, गैरसमज दूर केले. यावेळी साप मानवाचा कसा मित्र आहे पर्यावरणातील महत्वपूर्ण घटक आहे हे समजावुन दिले.