विलास केजरकर,
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा- जिल्हा पतंजलि योग परिवार भंडारा, पतंजली किसान सेवा समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जडीबुटी दिवस दिनांक ४ ऑगस्ट ला सकाळी ५.३० वाजता तुळजा भवानी नित्य योग वर्ग, खोकरला, खात रोड, भंडारा येथे जडीबुटी उत्सव व हवन यज्ञ, औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे वितरण व मार्गदर्शन तसेच सकाळी ८.३० वाजता खाबतलाव गार्डन कॉम्प्लेक्स, भंडारा येथे औषधी झाडांचे लागवड व दुपारी २ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन खांबतलाव गार्डन योग वर्गात करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व योग शिक्षक व योग साधक प्रेमी व नागरिकांनी औषधी वनस्पती वितरण, वृक्षारोपण व रक्तदान शिबीर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजलि योग परिवाराचे जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे, जिल्हा महामंत्री यशवंत बिरे, जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके व पतंजलि किसान सेवा समितीचे प्रभारी विलास केजरकर, योग शिक्षक व योग साधक प्रेमी यांनी केले आहे.

