विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या स्थानांतरणानंतर रिक्त झालेल्या पदावर नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांची नियुक्ती भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाने आदेश काढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांची चार दिवसांपुर्वी तडकाफडकी बदली राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी नवीन पोलिस अधीक्षक कोण हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर आज नागपूर शहराची पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांची भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात गृह विभागाने आदेश काढले आहेत. ते ५ ऑगस्ट रोजी नवीन पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्याची माहिती आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून मतानी यांची ओळख आहे. आता लोकांना त्यांच्याकडून भंडारा जिल्ह्यातील खूप अपेक्षा आहेत. त्यांचे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, तसेच नागरिकांनी स्वागत केले आहे.