राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड : महिला आर्थिक विकास महामंडळ व्दारा संचालित दिशा लोकसंचालीत साधन केंद्र तळोधी (बा.)ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतिच साईमगंल कार्यालय येथे उत्साहात सपंन्न झाली.”आझादी का अमृत महोत्सव” या अतंर्गत शासनाच्या नवनविन योजना महिला बचत गटांना देऊन महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न नागभिड व सिन्देंवाही तालुक्यात दिशा सिएमआरसी करीत असल्याने शेकडो महिलां या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित होत्या.यावेळी वार्षीक सर्वसाधारण सभेदरम्यान लेखापुस्तक,आर्थिक विवरण पत्रक, लेखापरिक्षणाचे वाचन, कृतीअहवाल, वार्षिक कृती आराखडा, व अंदाजपत्रक अहवाल याबाबत चर्चा करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी रक्त तपासणी शिबिर व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम आरजीबी सचिव प्रियाताई सोनटक्के यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मनिषा गुरूनूले, अंजली गेडाम, शिला राऊत, शिल्पा कामडी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे निमित्याने महिलाना आरोग्य विषयक महिती वैद्यकिय अधिकारी डाँ. विनोद गेडाम यांनी दिली तर बँक व्यवहारा विषयक माहिती शाखा व्यवस्थापक अर्जून लेंडे, विनय नवखोर राहुल लांजेवार यांनी दिली, तर कृषिविषयक माहिती तालुका कृषि अधिकारी प्रिया शिन्दे यांनी दिली. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यां सिएमआरसी कार्यकर्तेनां प्रमाणपत्र देवून संन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन जया बागडे, यांनी केले. तर प्रास्ताविक विनोद मुगंमोडे, यांनी केले. अहवाल वाचन भारती गेडाम यानी केले. उपस्थिताचे आभार श्रिदेवी शेन्डे यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

