संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध : सातत्याने शिक्षकांना करावी लागणारे अशैक्षणिक कामे, मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे या बाबींच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर होणारा विपरीत परिणाम हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने,आम्हाला फक्त शिकवू द्या,लेकराले शिकू द्या म्हणत प्राथमिक शिक्षक दिनांक 8 ऑगस्ट रोजी राज्यभर सत्याग्रह आंदोलन केले असून त्याचाच भाग म्हणून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे देवून मा. मुख्यमंत्री महोदय यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे मॅडम यांच्या मार्फत महारष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अशैक्षणिक कामे काढून घेण्यासाठी निवेदन दिले आहे. शिक्षकांवर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रमाचा भडिमार , दररोजची माहिती संकलन , गैरवाजवी प्रशिक्षणाचा अतिरेक, शालेय पोषण आहार चे माप व अशैक्षणिक कामाचा ताण यामुळे शिक्षक अध्यापन कार्यापासून सातत्याने परावृत्त होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असून त्याचे खापर शिक्षकांवर फोडले जात आहे. म्हणूनच आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याबाबत पुढाकार घेत विद्यार्थ्यांचे हित , शिक्षकांची अस्मिता आणि राष्ट्राच्याभवितव्या करिता ,आम्हाला फक्त शिकवू द्या.अशी हाक देत अनोखे धरणे व सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारला आयोजित केले गेले यासोबतच राज्यस्तरावरील विविध प्रलंबित असलेले प्रश्न व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्न या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री,शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना देण्यात आले असून, प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेणें , बी एल ओ कामे काढून घेण्यासंदर्भात 42 मागण्यांचे निवेदन दिले या वेळी शिक्षक समितीचे जिल्हा नेते मनोज दीक्षित , जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार , एल.यू.खोब्रागडे , संदीप मेश्राम ,संदीप तिडके , डी. एच. चौधरी , विनोद बडोले, एन.बी.बिसेन, पी. आर. पारधी, प्रदीप बडोले, रमेश गहाने, दिनेश उके,संजय बोपचे, एस. डी. नागपुरे, दिनेश विसेन, गजानन पाटणकर, क्रिस काहालकर, महेश कवरे , शोभेलाल ठाकूर, विलास डोंगरे , किरणं बिसेण , विनोद बाहेकर , सेवक रहांगडाले, नरेंद्र सुरजोशी, अशोक बिसेंन, गौतम बांते, सतीश दमाहे, दिलीप लोधी, उमेश रहांगडाले , रजनी मेश्राम, राजु बोपचे, आर. सी. मंदेले, भारती तिडके , टी.एम.शहारे, माधव टेंभरे, दिलीप नवखरे, मुरलीधर खोटेले, शरद उपलपवर , शरद पटले, रामेश्वर वाघाडे , डी वी चेलानी , प्रवीण दामहे,झेड.बी. दमाहे, माणिक ठाकरे,हेमकृष्न टेंभूरणे,उपस्थित होते.

