विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या ‘नेचर पार्क’ ला सहा वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सहावा “वृक्षांचा वाढदिवस” अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. हा अशा प्रकारचा आगळावेगळा व अभिनव उपक्रम राबविण्याचा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा सहावा वर्ष होता. सर्वप्रथम ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या “नेचर पार्क” मध्ये गोलाकार गांडूळ खताचा केक तयार करून त्याला पाने, फुले इत्यादींनी आकर्षक सजविण्यात आले.त्यानंतर त्यावर फुलांनीच “सहावा वृक्षांचा वाढदिवस” असे लिहिण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उद्देश सर्व उपस्थिताना समजावून सांगताना सहा वर्षापूर्वी पडीक असलेली जागा आता विविध वृक्ष, लता वेलींनी हिरवीगार झाली आहे त्याप्रती निसर्गाचे, वृक्षांचे उपकार मानण्याकरिता ”वृक्षवाढदिवस तसेच वृक्षरक्षाबंधन” कार्यक्रम दरवर्षी पर्यावरणस्नेही रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी लाखनी नगरपंचायतचे नगरसेवक संदीप भांडारकर, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी व सिध्दार्थ विद्यालय सावरीचे प्रभारी हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे तसेच ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी सेवानिवृत्त मेजर ऋषी वंजारी,गुरुकुल आय टी आयचे प्राचार्य खुशालचंद मेश्राम यांनी सर्वप्रथम “गांडूळखत रुपी केक” जवळ असलेल्या वृक्षांचे पूजन करून झाडांना वृक्षराखी बांधली. त्यानंतर ‘वृक्षप्रार्थना: करीत वृक्षांना गांडुळखत जमिनीत देण्यात आला.याचवेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा “वृक्ष माझा सखा- मी त्याचा रक्षणकर्ता”, ‘साजरे करू या पर्यावरणस्नेही रक्षाबंधन’ असा उद्घोष करून ‘नेचर पार्क’ मधील सर्व वृक्षांना स्वहस्ते बनविलेल्या आकर्षक अशा वृक्षराख्या तसेच बीजराख्या वृक्षप्रार्थना करीत बांधल्या व गांडुळखत झाडांच्या मुळाजवळ अर्पण करीत वृक्षांना औक्षवंण करून पर्यावरणस्नेही रक्षाबंधन केले. सर्वांना वृक्षवाढदिवस निमित्त प्रसाद वाटप पूजनानंतर करण्यात आले. अशा रीतीने ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, गुरुकुल आय. टी.आय. तर्फे एक आगळा वेगळा कार्यक्रम मागील पाच वर्षाप्रमाणे सहाव्यावर्षी सुद्धा पर्यावरणस्नेही रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाखनी बसस्थाकावरील ‘नेचर पार्क’ इथे घेण्यात आला.यावर्षी मुसळधार पाऊस कोसळत असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी या अभिनव व अनोख्या उपक्रमास वृक्षराख्या बनवून भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे प्रमुख अतिथी व स्पर्धा आयोजकांकडून अभिनंदन करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या “वृक्षराखी तसेच बीजराखी बनवा” स्पर्धेत सिध्दार्थ विद्यालय सावरी,राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी जि. प. गांधी विद्यालय तसेच माऊली कॉन्व्हेंटचे विद्यार्थ्यांनी आकर्षक वृक्षराख्या पर्यावरण संदेशासहित तयार केले. त्यांचे सर्व प्रमुख अतिथीनी कौतुक केले. या स्पर्धेमध्ये राणी लक्ष्मी कन्या विद्यालयामधुन हायस्कूल गटातून प्रथम क्रमांक सुहानी पाखमोडे हिला तर द्वितीय क्रमांक सृष्टी धांडे तृतीय क्रमांक सृष्टी वंजारी व सृष्टी नागपुरे यांना देण्यात आला. मिडलस्कुल गटातून चिन्मयी धांडे हिला प्रथम तर वैष्णवी धांडे ला द्वितीय व मनश्री निर्वाणला तृतीय क्रमांक देण्यात आला. सिध्दार्थ विद्यालय सावरी येथून प्रथम क्रमांक खुशी भुरे हिला तर शुभांगी झिंगरे ला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक दिव्या सानसरोदे व आर्यन धांडे यांना प्राप्त झाला. जि. प. गांधी विद्यालय येथून समीक्षा चौधरी ला प्रथम क्रमांक तर माऊली कॉन्व्हेंट येथील सृजाली मडावी ला प्रथम तर अनोखी झिंगरे ला द्वितीय क्रमांक तर समर्थ प्राथमिक येथून केशवी खुशालचंद मेश्राम ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक सिद्धार्थ विद्यालय सावरी येथील सृष्टी जांभुळकर, श्रीनय चाचेरे, धिरण बांगरे यांना प्राप्त झाला. सहभागपर प्रमाणपत्र अश्विनी खोब्रागडे, भाविका पचारे, खुशी राऊत, आकांक्षा पडोळे, मनीषा पचारे, मानसी दिघोरे, शेजल निर्वाण, गुंजन बांगळकर, नंदिनी यादव, अर्चना गौपाले, रोहित कुंभरे, राकेश घनमारे, तन्वीर शहारे, यासिन शेख यांना प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षण लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा. अशोक गायधने, राणीलक्ष्मी विद्यालयाचे प्रभारी हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, सिध्दार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, सेवानिवृत्त मेजर ऋषी वंजारी, गुरुकुल आय टी आय चे प्राचार्य खुशालचंद मेश्राम, ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, अशोक नंदेश्वर, शिक्षक मोहन कापगते यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता गुरुकुल आय. टी. आय, मानव सेवा मंडळ तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

