विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांच्या मार्फत भंडारा जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणे, तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या इतर समस्यांचे निराकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागात मोठया प्रमाणात घरे क्षतिग्रस्त झाली आहेत अशा घरांचा तातडीने पंचनामा करूण नुकसान भरपाई देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे ग्रामिण भागातिल रस्ते वाहुन गेले. त्यामुळे आवागमन करणाऱ्या शेतकरी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा रस्तांकरीता शासनाकडुन अतिरीक्त निधीची मागणी करून रस्तांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. भंडारा शहरात खात रोड वरील रहीवासांच्या घरी व दुकानात अतिवृष्टीमुळे पाणी गेल्यामुळे फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर ठिकाणचे पंचनामे करून त्याना आर्थिक मदत करण्यात यावी. भंडारा जिल्हा रुग्णालय व ग्रामिण भागातील रुग्णालयात रूग्णांसाठी कोणत्याही आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. महिला रुग्णांकरीता व विशेष करून गर्भवती महिलांना औषधांच्या अभावामुळे मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे औषधांचा तातडीने पुरवठा करणे आवश्यक आहे. जिल्हा व ग्रामिण रूग्णालयांमधे वैद्यकीय अधीकारी व कर्मचायांचा अभाव असुन तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जिल्हयात कोरोना रूग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी तातडीची उपाययोजना, व आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खतांचा तुटवडा असुन तो उपलब्ध करून देण्यात यावा. शेतकऱ्यांकडून खत व बि-बियाणांचे दर मोठया प्रमाणात घेतले जात आहेत. यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही होणे आवश्यक आहे. भंडारा जिल्हयातील नागरीक व शेतकऱ्यांच्या उपरोक्त अडचणी सोडविण्यासाठी शासनाला अवगत करण्यात यावे, अन्यथा संपुर्ण जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अश्या प्रकारचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देतांना प्रामुख्याने प्रदेश महासचिव धनंजय दलाल, सरीता मदनकर, नरेंद्र झंझाड, आरजू मेश्राम, हेमंत महाकाळकर , राहुलदादा निर्वाण, राजु पटेल, उमेश ठाकरे, अरुण अंबादे , नागेश भगत, अश्विन बांगडकर, किरण वाघमारे, मंजूषा बुरडे, राजेश डोरले, गणेश बानेवार, ईश्वर कळंबे, अमन मेश्राम, राजेश वासनिक, संजय बोंद्रे, रोशन वासनिक, रमेश मदनकर, प्रिती रामटेके, चेतन माकडे, निशा राऊत, सोनल पवनकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

