राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड : तालुक्यातील गिरगाव येथे नुकतीच ग्रांमपंचायत ची आमसभा सपंन्न झाली व या ग्रामसभेत महत्मा गांधी तंटा मुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदी पुरुषोत्तम चालरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. पुरुषोत्तम चावरे यांचा कार्यकाळ उत्कृष्ट असल्याने पुन्हा जनतेनी त्यांची अध्यक्ष पदी निवड केली आहे. ते लक्ष्मी पतसंस्था तळोधीचे शाखाव्यवस्थापक असून त्यांना सामाजीक क्षेत्राची जान आहे.त्याच्या निवडी बद्ल गिरगाव येथिल ग्रांमपंचायत पदाधिकारी तसेच जनतेनी अभिनदंन केले आहे.