राहुल रामटेके
तालुका प्रतिशिधी,नागभिड
नागभीड : तालुक्यात येत असलेल्या पुलगाव (कोजबी) अंगणवाडी केंद्र क्र. १४६ येथील अंगणवाडी सेविका कडून गरोदर मातांना शिळे अन्न वाटप केल्याने गरोदर मातेच्या जिवाशी खेळ खेळणारी अंगणवाडी सेविका वर कारवाई करण्याची मागणी गरोदर माता सपना कृष्णा मळ काम व गावकरी वर्गाच्या वतीने करण्यात आली आहे.पुलगाव कोजबी येथील गुलाब फुकटू मेश्राम यांच्या घरी रात्रीला झालेल्या कार्यक्रम चा उरलेले शिळे अन्न येथील अंगणवाडी सेविका सौ.मंगला राजू थेरकर यांनी गरोदर मातांना शिळे अन्न वाटप करण्यात आले. मात्र शासनाच्या वतीने गरोदर मातांना शालेय पोषण आहार देऊन मातेचे देखभाल केली जाते. मात्र या ठिकाणी अंगणवाडी सेविका कडून दुर्लक्ष केले जात असल्याचे तक्रार महिला बालकल्याण विभाग केंद्र नागभीड यांच्या कडे दाखल केली असून संबंधित विभागाचे वतीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकरी वर्ग व गरोदर मातांनी केली आहे.