सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग : दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात हा दिवस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे ते एक थोर तत्वज्ञ विचारवंत, शिक्षकतज्ञ,लेखक,थोर शिक्षक व भारताचे राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने जिजामाता कॉन्व्हेन्ट अनसिंग येथे आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये’ शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने शाळेमध्ये स्वयं शासन कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी शालेय प्रशासन सांभाळून उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य केले.आजच्या दिवशी शाळेच्या प्राचार्या म्हणून वर्ग ९ ची विद्यार्थिनी कु.निकिता घोडके हिने तर उप प्राचार्या म्हणून वर्ग ८ ची विद्यार्थिनी प्रतिभा ढाले हिने भूमिका बजावली.तसेच सेवक म्हणून वर्ग ७ चे विद्यार्थी विवेक राठोड व विनीत राठोड यांनी उत्कृष्ट काम केले.