राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड: नागभिड तालुक्यातील किटाळी(बो.) येथिल ईसम शेळ्या रखवाली करीत असताना गावा शेजारी स्मशानभुमीजवळ झाडाखाली उभा असताना आज विज पडुन 4.10 वाजता मुत्यू झाल्याची घटना घडली.आज अचानक नागभिड तालुक्यात 4 वाजता पासुन वादळी पाऊस व विचेच्या गडगडाट सुरू झाला त्यामुळ गुराखी व शेतकरी यांना वेळच मिडाळी नाही. असातच नागभिड तालुक्यातील किटाळी (बो.).येथील रमेश हरी मेश्राम (वय 50 वर्ष) हा गावाशेजारी शेळ्या रखवाली करीत होता. अचानक विजेचा आवाज झाला व क्षणात विज पडून मृत्यु झाला. त्याचे परिवारात पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. विज पडून मृत्यु पावलेल्या इसमाचे कुटुंबास त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी असी मागणी सरपंच छगन कोलते यानी केली आहे.