महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने शनिवार दि. 10/09/2022 ला सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या अरविंद सभागृहात माहिती तंत्रज्ञानातील रोजगाराच्या संधी व वाणिज्य शाखेचे महत्त्व याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख मार्गदर्शक मा. नफीस अहमद, संचालक, कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, भद्रावती, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय टोंगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांनी वाणिज्य शाखेचे महत्त्व व माहिती तंत्रज्ञानातील रोजगाराच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक मा. नफीस अहमद म्हणाले की, आज वाणिज्य शाखेचे महत्व सतत वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानात वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे. कार्पोरेट श्रेत्रात वाणिज्य व संगणक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. यासाठी आयटी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय टोंगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बंडु जांभुळकर, प्रा. डॉ. सुहास तेलंग, इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.

