राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी नागभिड
नागभिड : समाजातील अंधश्रदा सोडून देश बलवान बनविण्याचे आव्हान यशवंत कायरकर यांनी केले ते नागभीड येथील रुक्मिणी सभागृहात येथे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड ) द्वारा आयोजित स्वयंसहायता गट नेतृत्व विकास कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमांमध्ये नाबार्ड चे अधिकारी तृणाल फुलझले यानी सांगितले की, महिलांनी गटाच्या माध्यमातून सक्षम बनावे, त्यासाठी महिलांनी अनेक असे व्यवसाय आहेत की, त्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात पैसा मिडू शकते. त्यानंतर गुणवंत वैद्य यानी सांगितले की महिलांनी गटांच्या माध्यमातून विविध गृह उद्योग करून आपल्या परिवाराचा उदाहनिर्वाह करावे. गृह उद्योगातून महिलांनी सक्षम बनावे यासाठी वैद्य सरांनी गृह उद्योगाचे,व्यवसायाचे अनेक उदाहरण दिले. त्यानंतर सहारे मॅडम यांनी महिलांच्या आरोग्य विषयक माहिती देऊन कार्यक्रमात विशेष भर घातली. शम्मा शेख यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भाष्य केले. प्रमुख मार्गदर्शक यशवंत कायरकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव नागभीड यांनी ‘महिला व अंधश्रद्धा’ या विषयावर मार्गदर्शन करताना, “जग मंगळावर पोचला मात्र आपण मंगळ-अमंगळ यात गुंतलेले आहोत. ढोंगी बुवाबाबा भुत – भानामती, जादूटोणा, करणी, गुप्तधन, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा समाजात पसरवून महिलांना हे ढोंगी बाबा फसवितात त्यामुळे कित्येक परिवार उध्वस्त झालेले आहेत.” असे सांगत त्याबद्दल परिसरातील अनेक उदाहरणे देत ‘जादूटोणा विरोधी कायद्या २०१३’ आणि त्यातील कलमां बद्दल सविस्तर माहिती दिली. व अभा अं.नि.स. द्वारे चमत्कार करणाऱ्या बुवा बाबांना 25 लाखाचे आव्हान करत, या बुवा बाबांपासून सतर्क रहा, ‘अंधश्रद्धा सोडा समाज आणि देश बलवान बनवा.’ असे आवाहन यशवंत कायरकर यांनी केले.या कार्यक्रमाला तृणाल फुलझले नाबार्ड अधिकारी, शम्मा शेख अध्यक्ष अवॉर्ड संस्था, गुणवंतजी वैद्य अवार्ड सचिव, सहारे मॅडम, यशवंत कायरकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव तथा सर्पमित्र, रूपचंदजी दखणे, कीर्तीमाला ढोक माजी सरपंच डोंगरगाव,भोजराज नवघडे, कैलास ननावरे,पुष्पाताई मरगडे, लीनाताई शेंडे, सुनीताताई गाठे आणि शेकडो महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन युवराज रामटेके यांनी तर भोजराज नवघडे आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता यांनी केली.

