राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक
गडचिरोली/एटापल्ली – स्थानिक एटापल्ली चा मुख्य बस स्थानक परिसरात जनावरे मोकाट फिरत असतात,या अश्या मोकाट जनावर मुळे कित्येकदा अपघात झाले आहे.
एटापल्ली येथील हिरो शोरूम ते शिवाजी चौक बस स्थानक परिसर व कासमसुर रोड या संपुर्ण परिसरात १०० ते १२० जनावरे मोकाट फिरत असतात,या मोकाट जनावर मुळे अपघाताला तोंड दयावे लागतो गावातील काही युवा पिढी भर वेगाने वाहने चालवतात रोडवर जनावर असल्या मुळे कित्येकदा जनावराचा सुद्धा अपघात होतो मागील ५ दिवसापासून ७ ते ८ गो माता चे सुद्धा अपघात झाले आहे. अपघात झालेल्या गो माताला व इतर जनावरांना स्थानिक सामाजिक संघटने कडून त्याचं उपचार करण्यात येत आहे परंतु प्रशासन याचा कडे दुर्लक्ष करीत आहे. नगरपंचायत समोर कांजी असून सुद्धा प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करती आहे. त्या मोकाट जनावराचे कांजी मध्ये सुव्यवस्था करून त्याना मार्गी लावण्यात यावी अशी मागणी एटापल्ली चे गावकरी व सामाजिक संघटनेच कडून करण्यात येत आहे