महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : पंचायत समिती वरोरा अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत आब मक्ता मध्ये शासकीय निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचे गावकऱ्यांनी आरोप केला आहे. आब मक्ता ही गट ग्रामपंचायत असून आब, वडगाव व येरखेडा या तीन गावा मिळून गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कार्यालय आब मध्ये आहे. या कार्यालयामध्ये सचिव, सरपंच व काही सदस्य यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत आहे. सदर गैर व्यवहाराची हिशोब घेण्यासाठी विशेष ग्रामसभेची आयोजन 6/ 9 /22 ला नोटीस काढून ठेवण्यात आली होती. परंतु बुद्धि पुरस्कार सभेला हजर न राहून सचिव, सरपंच व सदस्यांनी दिवसभर गावकरी यांना सभेच्या ठिकाणी तात्काळत ठेवले व गावकऱ्यांना दिलेल्या हास्यस्पद वर्तणुकीमुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. सदर ग्रामपंचायत मध्ये सचिवाकडून ग्रामपंचायत साठी लागणाऱ्या साहित्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहेे. त्यामुळे गावकऱ्यांनी सदर घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी असा पवित्र घेतलेला आहे.त्या अनुषंगाने गावकरी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन दिले पण त्याची कुठलीही कारवाई न झाल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, वनमंत्री तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, व हंसराजभाऊ अहिर यांना निवेदन दिले आहे.सचिव हा शासन आणि ग्रामपंचायत यामधील दुवा असून त्यांच्याकडूनच जर असल्या प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर गावकऱ्यांनी करायची काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी असा पवित्रा गावकऱ्यांनी आता घेतलेला आहे.

