संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
नवेगावबांध:-नागझिरा वन्यजीव अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात सन १९८७ पासून ५० हंगामी वनकामगार काम करतात.नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प अंतर्गत साकोली वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वेगवेगळ्या परिसरात वनमजूर, वनकामगार वरिष्ठांचे आदेशान्वये दिलेल्या कामाच्या स्वरुपात काम करीत असून,वनांचे संरक्षण करीत आहेत. सदर अभयारण्यात १८कॅम्प बनविले आहेत.वायरलेस संच बसविले आहेत. त्यामध्ये रात्रंदिवस पहारा करून अवैध वृक्षतोड, अवैध शिकार,गुरेचराई, अतिक्रमण,वन्यप्राण्यांची जोपासना तसेच वनवा विझविण्याचे काम करतात.त्यातच सन २०२१ मध्ये वनवनवा विझविताना चार मजूरांचा होरपळून मृत्यू झाला होता.तरीपण कामगारांनी शासनाचे आदेशान्वये अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात गस्ती घालून दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता वन्यप्राण्यांची सुरक्षा व वनांचे रक्षण करण्याचे काम करीत आहेत.सन १९८७ पासून सर्व ५०वनमजूर नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात बारमाही काम करत असून दरवर्षी २४० दिवस पेक्षा जास्त दिवस काम करीत आहेत. या वनमजूरांचे बाजूने कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात कोर्ट केस मध्ये निर्णय लागलेला असून सुद्धा या वनमजूरांना कायमस्वरूपी करण्यात आले नाही.आजही वनमजूर तुटपुंज्या मजूरीवर रात्रंदिवस वनांचे संरक्षण करीत आहेत.या वनमजूरांचे सहा-सहा महिने पगार होत नाही.तरीपण वनांचे संरक्षण करीत आहेत.न्यायाधिकार दंडाधिकारी यांचे आदेशान्वये अधिन राहून संपूर्ण वन कामगारांनी आपली बाजु मांडून वरिष्ठ कार्यालयात पत्र सादर केला आहे.परंतू कार्यालयातून वनकामगारांच्या वतीने प्रतीसाद तसेच कायमस्वरूपी करण्याचे आदेश अजूनही झालेले नाही.त्यामुळे संपूर्ण वन कामगारांत असंतोष पसरला असून नाराजीचा सूर पसरलेला आहे.
या वनकामगारांना सहानुभूती पूर्वक विचार विनिमय करून संबंधित कार्यालयांना आदेश देऊन शासनाचे नियमाप्रमाणे सर्व ५० वनकामगारांना करण्याचे आदेश द्यावे.तसेच सन १९८७ पासून कार्यरत असलेल्या वनकामगारांना मागिल भरपाई पूर्ववत करून द्यावे. या मागणीसाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना वनकामगार मोरेश्वर खोब्रागडे,सुंदर रामटेके,हेमराज कंगाली यांनी वनकामगारांचे वतीने निवेदन दिले आहे.

