राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड : पाटबंधारे विभाग चंद्रपूर अंतर्गत सिंचाई विभाग शाखा गोविंदपूर येथील घोडाझरी नहरावर मागील ३२ वर्षांपासून नहराच्या किरकोळ व पाणी वाटप कामगार कामावर असून २९ ऑगस्ट पासून घोडाझरी कालवा सुरू करण्यात आले होते व ६ नोव्हेंबर रोजी नहर बंद करण्यात आले. तेव्हा पासून आज पर्यंत जवळपास तीन साडेतीन महिन्यापासून मजुरांना मजूर मिळाली नसल्याने घोडाझरी कालव्याचे हंगामी कामगार संघटना आता आक्रोश करीत आहेत.घोडाझरी सिंचाई विभागाचे डि.एस.जुणूनकर उपविभागीय अधिकारी तथा शाखा अधिकारी यांना मजुरी बाबत कामगार बोलले असता त्यांनी पाणीवाटप ठेकेदार सोहम खाजी पठाण तळोधी बा. यांना मजुरी मागण्यासाठी मजुरांना सांगण्यात आले. मात्र मजूर मजुरी मागण्यासाठी गेले असता संबंधित ठेकेदार हे कामावर कामगार कमी असून हजेरीपटावर हजेरी जास्त असल्याने मी कामगारांची मजुरी देणार नाही असे उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आता घोडाझरी हंगामी कामगारांचे आपल्या मजुरीची मागणी कुणाकडे करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.हंगामी कामगार पाणीवाटप व नहरांचे किरकोळ काम करतांना ना कधी ठेकेदार बघितले ना त्यांचे दिवानजी मग आम्ही केलेल्या कामाची मजुरी मागायची कुणाला २९ ऑगस्ट पासून ते आजगत कामगारांची पाणीवाटप व नहरांचे किरकोळ कामे पूर्ण तीन साडेतीन महिने केले असून तरी आम्हाला मजुरी देण्यात आलेले नाही. आमच्या या सदर समस्येला उपविभागीय अधिकारी तथा शाखाधिकारी डि.एस. जुणूनकर हेच कारणीभूत आहेत या बाबीची वरिष्ठांनी चौकशी करायला हवी अशी कामगार संघटनेनी मागणी केली आहे.

