सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग:- येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. दि. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर हा कालावधी सामाजिक न्याय पर्व म्हणून या वर्षी साजरा करण्यात येणार आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, घडविण्याचा व सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने राज्यघटना अंगिकृत करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्याचा मानस महाविद्यालयामध्ये करण्यात आलेला आहे. याची सुरुवात आज संविधान दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक गुल्हाने तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनोद राठोड हे उपस्थित होते. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका वाचन करण्यात आली. भारतीय संविधानाचे मूल्य भारताच्या घडणीमध्ये संविधानाची भूमिका आणि भारतीय संविधान जतन करण्यासाठीचे आपले कर्तव्य याबाबत प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागृत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित सर्वांनी उद्देशपत्रिकेचे वाचन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्याथी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सचितानंद बिच्चेवार यांनी सःचालन व प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन बनचरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांनी सहयोग दिला.

