संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध:- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत दाभना, अरततोंडी, इंजोरी पिंपळगाव,खांबी,बाकटी या गावातील शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत बाकटी जवळील बोरटोला गावालगतच्या भागी रिठी पहाडी जवळ दि.२७ नोव्हेंबर ला ठाण मांडून बसलेल्या, हत्तीच्या कळपाने दि.२८ नोव्हेंबर ला दुपारच्या सुमारास गुढरी,सोमलपुर, सिरेगाव बांध या मार्गाने भंडारा वन विभागामध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारच्या सुमारास शिवनीबांध जलाशयाच्या कडेने झाडगाव,नैनपुर,पापडा मार्गे
महालगावात हत्तीच्या कळपाने आपले बस्तान मांडले आहे. गुढरी, सोमलपुर, सिरेगावबांध येथील शेतातील धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणावर हत्तीच्या कळपाणे प्रचंड नुकसान केली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातून हत्तींच्या कळपाने भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वावस टाकला आहे. दि.२६ नोव्हेंबर च्या रात्रीच्या सुमारास अर्जुनीमोरगाव तालुक्यातील दाभणा, अरततोंडी,पिंपळगाव, खांबी, इंजोरी, बाकटी,चांना येथील शेतातील धनाच्या पूजण्याची नासधूस करीत हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला होता. तर काल रात्रीच्या सुमारास गुढरी,सोमलपूर,सिरेगावबांध येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेतातील धानाचे कुंजणे व उसाच्या वाड्या उध्वस्त करीत हत्तीचा कळप गोंदिया वन विभागातील नवेगावबांध अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातून निघून गेल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्ऱ्यांनी देखील सुटकेचा निस्वास टाकला आहे. सोमल्पुरी येथील पांडुरंग कान्हेकर यांच्या दीड एकर शेतातील व इतर शेतकऱ्यांच्या उसवाडी पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी लेखी अर्जाद्वारे वनविभागाकडे केली आहे. पुन्हा हत्तीचा कळप अर्जुनी मोरगाव तालुक्यात परत तर येणार नाही ना? अशा प्रकारची धास्ती वनविभागात व शेतकऱ्यात आजही वाटत आहे. महालगाव स्थित असलेल्या हत्तींच्या कळप आता नागझिरा अभयारण्याकडे वळतो की, पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल होतो, याकडे वनविभागाचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

