निशांत राठोड
शहर प्रतिनिधी ,चोहोट्टा बाजार
चोहोट्टा बाजार दि.19 सप्टेंबर :-तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथे 17 लाखाची दरोडा पडला असल्याची माहिती अकोट उपविभागातील तेल्हारा ठाणेदार विकास देवरे व अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड तसेच दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार कात्रे यांना मिळताच पो.कॉ.गोपाल जाधव व शेखर पांडे या 2 कर्मचारी यांनी सिनेस्टाइल स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आरोपीचा पाठलाग करून दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत पाळत ठेवीत पळसोद फाट्याजवळ असलेले दनोरी गावाजवळ बंटी आणि बबली या 2 आरोपी महिलेसह पकडण्यात आले.पोलीस विभागाने दरोडा टाकणाऱ्या या बंटी आणि बबलीचा अधिक उपद्रव करण्या आधिच जेरबंद केल्याने सर्वत्र सुटकेचा निश्वास टाकण्यात येत असून पोलीसांच्या कारवाईचे कौतूक होत आहे.