महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.३०:-भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दि.३० एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ९६.२४ टक्के मतदान झाले असून ११७२ पैकी ११२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.एकूण १८ संचालक असलेल्या या बाजार समितीत मोहन व्यंकटी भुक्या हे ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल घटकातून शेतकरी सहकार शिवसेना आघाडीकडून अविरोध निवडून आले. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी मतदान घेण्यात आले. याकरिता ३७ उमेदवार रिंगणात होते.सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानाकरिता जि.प.हायस्कुल भद्रावती, जि.प.प्राथ.शाळा नंदोरी व जि.प.प्राथ.शाळा चंदनखेडा असे तीन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. यात भद्रावती केंद्रावर ४५२, नंदोरी केंद्रावर ३८० आणि चंदनखेडा केंद्रावर २९६ मतदान
झाले. मतदानानंतर काही वेळाने मतमोजणीला सुरूवात झाली.मात्र वृत्त लिहीस्तोवर निकाल हाती आले नव्हते. या निवडणुकीत खा. बाळू धानोरकर आणि आ. प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी व रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार शिवसेना आघाडी या दोन आघाड्या एकमेकांविरोधात निवडणूक मैदानात उतरल्या होत्या.

