संदीप सोनोने
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : कृषिप्रधान” असलेल्या आपल्या देशात “शेतीचे शिक्षण” प्राथमिक स्तरावरून देण्याची सोय नव्हती. शेती प्रधान देश असल्यावरही याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. हिच अनुषंगाने शालेय शिक्षण सोबतच शेती शिक्षण अनिवार्य करावे या मागणीसाठी माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांनी गत विस वर्षांपासून शासन दरबारी प्रश्र्न लावून धरला होता, अखेर पुढील शैक्षणिक सत्रा पासून शालेय शिक्षणामध्ये शेती हा विषय समाविष्ट करून दखल घेऊन विषयाला चालना दिली , या पार्श्वभूमीवर कृषीमंञी मा. अब्दुल सत्तार सह मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व ऊपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे माजी आमदार तथा महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांनी आभार मानले आहेत. दरम्यान 2004 या वर्षात अकोला जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती असताना अकोल्याच्या डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात, तत्कालीन राज्यपाल मा. मोहम्मद फजल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा त्यांनी आयोजित केली होती. तेव्हापासून या मागणीसाठी पुढाकार घेतला होता, तर तुकाराम भाऊ बिडकर पुढे आमदार झाल्यावर विधानसभे सह ज्या, ज्या ठिकाणी त्यांना ही मागणी करता येईल त्या, त्या ठिकाणी ही मागणी करत पाठपुरावा सुरू होता अखेर माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांच्या लोक कल्याणकारी मागणीला आता यश आले, दरम्यान आगामी शैक्षणिक वर्षापासून कृषी शिक्षण शालेय शिक्षणामध्ये अंतर्भूत करण्याचा निर्धार ना. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या जवळ व्यक्त केला. शेती शिक्षण हे शालेय शिक्षणात किती महत्त्वाचे आहे हे ओळखून व जाण ठेवून घेतलेल्या निर्णयाबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अकोला येथे आले असताना प्रा. तुकाराम बिडकर यांच्या नेतृत्वात महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर, ओबीसी सेल महानगर अध्यक्ष अनिल मालगे, राजदत्त मानकर सह त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्त भूमिपुत्रांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानलेत.

