निशांत राठोड
प्रतिनिधी शहर चोहोट्टा बा.
आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी कृषी व पशु संवर्धन सभापती मा. पंजाबराव वडाळ यांनी आज अकोट तालुका मधील चोहोट्टा परिसरातील पिलकवाडी या गावाला भेट दिली असता त्या गावातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पिलकवाडी गावामध्ये गेले एक महिना भरा पासून पिण्याचे पाणी पोहचले च नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या विषयावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून लवकरत लवकर या गावाची समस्या दुर करणार. असे सांगण्यात आले.
यावेळी उपस्तिथ कृषी व पशु संवर्धन सभापती मा. पंजाबराव वडाळ. निलेश बगाडे.गणेश बुटे. श्रीकृष्ण लांडे.नामदेव मोडक. मंगेश ताडे. दिनेश वाघमारे. सदाशिव ठाकरे गौतम मोरे. ज्ञानेश्वर मोडक. आणि गावातील आदी नागरिक उपस्तिथ मध्ये पाहणी केली.