महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.४:-नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला दणदणीत विजय मिळाला असून याचे श्रेय शिवसेना ठाकरे गटाचे वरोडा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांना जाते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात एक संचालक अविरोध निवडून आला. तर उर्वरित ११ संचालक प्रत्यक्ष मतदानाने निवडून आले.अशा प्रकारे एकूण १८ पैकी १२ संचालक निवडून आणण्यात रवींद्र शिंदे यांना यश आले आहे.त्यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार शिवसेना आघाडीला मोठे यश मिळाले. त्यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून वरोडा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात गरजुंना आर्थिक मदत करुन समाजसेवा करण्याचा धडाका सुरू केला आहे.तर काही कार्यकर्त्यांच्या मदतीने अनेक सहकारी सेवा संस्थांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शेतकरी सहकार शिवसेना आघाडीकडून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मोहन भुक्या, भास्कर ताजने, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर आगलावे, विनोद घुगूल, शरद जांभुळकर, भास्कर तिखट, गजानन उताने, आश्लेषा जीवतोडे, शांता रासेकर, परमेश्वर ताजने, शामदेव कापटे यांचा समावेश आहे. तर खा. बाळू धानोरकर आणि आ.प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. या आघाडीच्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये राजेंद्र डोंगे, प्रवीण बांदुरकर, अतुल जीवतोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी व राजू आसुटकर यांचा समावेश आहे.

