संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध : नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील रॉक गार्डनचे व कॉन्फरन्सचे हॉल या दोन कामांचे गेल्या १४ वर्षापासून लोकार्पण न झाल्याने, निवडून आल्यापासून गेल्या चार वर्षापासून याबाबत कुठली चर्चा व बैठक गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांनी लावली नाही. याच्या निषेधार्थ येथे एका भूमिपूजनासाठी खासदार मेंढे येथे आले असता, विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात असताना,येथील आझाद चौकात सकाळी ११.३५ वाजेच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून खासदार मेंढे यांचा निषेध करण्यात आला. खासदार मेंढे निवडून आल्यावर सत्कार स्वीकारण्याच्या समारंभा निमित्त पहिल्या वर्षी तालुक्यात आले होते.त्यावेळी येथील टी पॉइंट चौकात नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने खासदार मेंढे यांना निवेदन देऊन या कामाची आठवण करून देण्यात आली होती. यावर बैठक लावून चर्चा करू असे आश्वासने खासदारांनी त्यावेळी दिले होते. त्यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्या मालकीच्या मे.सन्नी कन्स्ट्रक्शन भंडारा यांनी रॉक गार्डन व येथील कान्फरन्स हाल चे बांधकाम कंत्राटदार म्हणून केले होते. हे येथे उल्लेखनीय आहे. नवेगावबांध येथील पर्यटन संकुल स्थळी सन २००३-०४ या आर्थिक वर्षात रॉक गार्डन व कॉन्फरन्स हाल करिता कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला होता. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील सनी कन्स्ट्रक्शन ज्याचे मालक विद्यमान खासदार सुनील मेंढे हे आहेत.असोसिएट अश्फाक अहमद यांच्या मदतीने सदर काम करायचे होते.२००७-०८, २००८-०९ या कालीवधी मध्ये हे बांधकाम करण्यात आले होते. सदर काम करतेवेळी त्या कामात बऱ्याच तफावती होत्या. नवेगावबांध संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा, अन्यथा दोषींवर कारवाई करा.एवढेच मागणी करण्यात आली होती. या मागणीला धरून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने रामदास बोरकर यांनी लोकायुक्ताकडे दाद मागितली होती. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यावेळी आपण सदर कामाचे लोकार्पण करा किंवा दोषींवर कारवाई करा.एवढी मागणी लावून धरली होती. नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांची तीन वर्षांपूर्वी भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. त्यांना सर्व काही विसरून त्या गार्डनची डागडूजी करून, त्याचे लोकार्पण करण्याची विनंती करण्यात आली होती.परंतु वर्षा मागून वर्ष लोटून ही नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील त्या गार्डनचे व कॉन्फरन्सचे लोकार्पण न झाल्याने,या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध येथे आज दिनांक ६ मे रोज शनिवारला येथील आझाद चौक येथे खासदार सुनील मेंढे हे येथील ग्रामपंचायत समोरील जलजीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजनासाठी विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात असतांना आझाद चौक येथे रामदास बोरकर,नवेगावबांध फांऊडेशन,मुकेश चाफेकर शाखाप्रमुख ठाकरे सेना,घनश्याम कापगते शाखा उपप्रमुख ठाकरे सेना यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला.अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. झालेल्या प्रकाराबद्दल क्षणभर थांबून खासदारांचा ताफा कार्यक्रम स्थळी पोहोचला.
कोट
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध पर्यटन संकुलाचे पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा याकरिता संघर्ष समितीचा पंचवीस वर्षांपूर्वीपासून विकासाकरिता संघर्ष सुरू आहे.शासन व जनप्रतिनिधी याना निवेदनातून विकासाची मागणी करण्यात येत आहे ,याचाच एक भाग म्हणून 2003 च्या कालावधीमध्ये कोट्यावधीचा रुपयांचा निधी संकुल परिसराच्या विकासासाठी प्राप्त झाला. त्यामध्ये राग गार्डन व कॉन्फरन्सलचे काम हाती घेण्यात आले होते.परंतु कामांमध्ये फार तफावत होती आणि दिवसा मागून दिवस निघून जात असताना सदर कामाचे लोकार्पण होत नव्हते.या कामाचे लोकार्पण करण्यात यावे व कामाचे लोकार्पण होत नसेल, तर दोषींवर कारवाई करण्यात यावी एवढी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने माननीय खासदार यांना आपण प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आपल्या हातून हे काम झालेले आहे. आपण त्याची डागडूजी करून ते लोकार्पण करावे,ही अपेक्षा होती. तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही.त्याचे स्मरण करून द्यावे आणि याकडे दुर्लक्ष केले म्हणून, आम्ही खासदारांना काळे झेंडे दाखवून आज नवेगावबांध येथे निषेध केला.- रामदास बोरकर, अध्यक्ष,नवेगावबांध फाउंडेशन

