सुधाकर सिडाम
तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा-:सिरोंचा तालुक्यात झिंगानूर उप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडदेली येथील पेंटा आत्राम व पेंटा पिडा आत्राम हे दोघे दिनांक 12 आॅगस्ट रोजी बँकेच्या कामानिमित्त झिंगानूर वरुन आसरअल्ली येथे मोटरसायकलाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकल समोरा-समोर आसरअल्ली गावाच्या वळणावर अपघात झाला असता एकाचा डोक्याला मार लागला आणि दुसरा व्यक्तिला पाय तुटला असता दोन्ही व्येक्तीना उपचारासाठी चंद्रपूर शासकीय दखल केले होते यात एकाचा पाय कापावा लागले असून दोघेही उपचार घेऊन गावी परत आल्यावर त्यांना ओषधी बाबतीत अडचण निर्माण होत असल्याची माहिती प्रभारी ठाणेदार यांना या बाबतीत माहिती प्राप्त होताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक व पोलीस ठाण्यात कार्यरत इतर पोलिसांना याबाबत माहिती देत त्यांचा मदतीने अपघातग्रस्त करिता 20000 हजार रुपयाची मदत केली व त्यांना गावातील पोलीस पाटील सरपंच व कलेड येथील सरपंच वडदेलीचे पोलीस पाटील मान्गीगुदम येतील पोलीस पाटील व गावातील नागरिकांचा उपस्थिती मध्ये ही 20हजार रुपयाचे आर्थिक मदत जखमींना देण्यात आली आहे