ताज्या घडामोडी

गडचिरोली बाजारपेठ दिनांक २३/९/२०२० ते ३०/९/२०२० पर्यन्त पूर्णपणे बंद राहणार .

फुलचंद वाघाडे
तालुका प्रतिनिधि गडचिरोली
न्यूज २४ मराठी

गडचिरोली:- मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे काही नागरिकांचा मृत्यु झालेला आहे . हा वाढत असलेला प्रसार थांबविण्यासाठी व जनतेचे सुरक्षा हित लक्षात घेवून शहरातील व्यापारी संघटना , नगर परिषद गडचिरोली व सर्व पक्षीय नेत्यांनी २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२० बुधवार ते बुधवार पर्यंत गडचिरोली शहर पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे .
या निर्णयानुसार शहरातील दूध , औषधिचे (medicals) व कृषिकेन्द्र ही दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी राहिल . या जनता कर्फ्यूला गडचिरोली शहरातील नागरिकांनी व व्यावसायिकानी आपआपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे . कोणीही अकारण आपल्या घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी . वैद्यकीय सेवा व मेडिकल नियमाप्रमाणे सुरूच राहणार असून , या जनता कर्फ्यूला सर्व जनतेनी सहकार्य करून यशस्वी करावे असे आव्हान शहरातील व्यापारी संघटना , नगर पालिका व सर्व पक्षीय नेत्यांनी केले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close