राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक
गडचिरोली/भामरागड – जिल्ह्यातील नक्षल सप्ताहाच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडु नये यासाठी नक्षल हालचालींवर करडी नजर ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले. या पार्श्वभुमीवर भामरागड पोलीस प्रशासनच्या वतीने प्रमुख मार्गावर नाकेबंदी करुन वाहन तपासणी तीव्र करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग भामरागड उप विभागात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि संदीप भांड, पो.उप.नि. मंगेश कराडे, पो.उप.नि.किरण उघडे हे खबरदारी घेत आहेत. यासंदर्भात बाहेरुन ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरु केली आहे. अनोळखी मानसाची विचारपुस करुन सोडताहेत . भामरागड- लाहेरी, भामरागड -आलापल्ली, भामरागड-आरेवाडा, भामरागड- कोठी या प्रमुख मार्गावर भामरागड जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवान तपासणी करीत आहेत.