बदली झालेल्या शिक्षकांना पेढे भरवून दिला भावस्पर्शी निरोप प्रहार शिक्षक संघटनेतर्फे
विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी/परंडा
परंडा:-आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी जिल्हास्तरावरून दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी कार्यमुक्त केल्यानंतर तालुका स्तरावरून परंडा गट शिक्षण कार्यालयाचे अंतर्गत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना गट शिक्षणाधिकारी अनिता जगदाळे यांनी कार्यमुक्त केल्याने प्रहार शिक्षक संघटनेने सर्वांना पेढा भरवून स-हदय निरोप देण्यासाठी पुढाकार घेतला.संतोष पोकलेवाड जिल्हा नांदेड, विलास थिटे जिल्हा सोलापूर, आशाबाई खटके जिल्हा अहमदनगर, पंजाब खंदारे जिल्हा यवतमाळ, रणवीर गायकवाड जिल्हा पालघर,शालीराम बागूल जिल्हा धुळे आपापल्या जिल्हा मागणी नुसार संबंधित शिक्षक आपल्या स्वगृही गेले.
परंडा तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मनापासून भरभरून काम करून शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवली,पुढेही आपापल्या जिल्ह्यात अशीच शैक्षणिक गुणवत्ता वाढवून जिल्ह्याचा नावलौकिक करावा या हेतूने बदली झालेल्या सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन व पेढा भरवून भावनिक निरोप दिला.यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे,प्रहार जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा कोषाध्यक्ष रघूनाथ दैन, विषय साधन व्यक्ती दिनकर साबळे,मनिषा जगताप,अरविंद बाराते,बाळासाहेब डोके, परिचर सुषमा माने आदि.कर्मचारी उपस्थित होते.