ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर शहरासह देवर्जन, दावणगाव, शेकापुर, भाकसखेडा, गंगापूर आदी गावांना या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय परिसरातील जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पावर अवलंबून आहे. गेल्या सात वर्षापासून या प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यल्प होता. या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील शेतकरी व अनेक गावांची तहान भागणार आहे.
या मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यांचे पूजन शुक्रवारी (दि.२५) रोजी जिल्हा परिषद सदस्या सौ. उषा रोडगे यांच्या हस्ते झाले. जलसाठ्यांची विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, शंकर रोडगे, नारायण मिरगे, गंगाधर गरीबे, पुष्पा कुलकर्णी, अंतेश्वर रोडगे, नारायण पाटील, रामस्वामी कुसळकर, गोपाळ येलमटे, रमेश साकोळकर, शिवराज धोतरे, तेजेराव खटके उपस्थित होते.