जिल्हा कार्यकारणी गठित
विलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १ सप्टेंबर :- देश, राज्य व जिल्ह्यात कोरोना कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यावर प्रतिबंध म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाँकडाऊन घोषित केले. या दरम्यान सफाई कामगारांनी जिवाची पर्वा न करता सदैव अविरत कार्य करत आहेत. अशा कोरोना युध्दांना सन्मार्गांची वागणूक देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील सफाई कामगारांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी एकत्र यावे असे प्रतिपादन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनचे प्रदेशध्यक्ष जयसिंग कच्छवाह यांनी केले.
ते अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या आदेशान्वये
जिल्हा कार्यकारणी समाज भवन निशा विद्यालयासमोर भंडारा येथे नुकतीच गठीत करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड युनियनचे प्रदेशध्यक्ष जयसिंग कच्छवाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ रगडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश चमके, उपाध्यक्ष व्यास, नागपूर जिल्हा महामंत्री अक्षय वाल्मीकी , नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष महेश पांडे, व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा, तालुका व नगर परिषद स्तरावर कार्यकारणी गठित करून शुभेच्छा देण्यात आले. त्यात जिल्हा अध्यक्ष महेश पांडे, कार्याध्यक्ष कुमार रगडे, उपकार्याध्यक्ष वरकत शेख, उपाध्यक्ष हरिराम खांडेकर, सुरज खांडेकर, जिल्हा महामंत्री कुणाल सोनेकर, धीरज राणे, महासचिव मनोल सोनेकर, सचिव सुनील मेश्राम, कोषाध्यक्ष मुकेश बघेल, राजेश बिछवे, संगठनमंत्री संग्राम कटकवार, तालुका अध्यक्ष अनिकेत सांडेकर, मुनिष मोगरे, मुकेश शेंद्रे, मोहाडी अध्यक्ष आनंद गुणेरिया, साकोली नरेश
पांडे, महिला शहर अध्यक्ष रोशनी सकतेल, तुमसर अनुप शेंद्रे, रवी सोनवणे, उपाध्यक्ष रविशंकर रगडे व अन्य पदाधिऱ्यांचा समावेश करण्यात आले आहे.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे संचालन व आभार कुमार रगडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भंडारा शहरातील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत सांडेकर, सुरेंद्र बन्सोड, गीता शेंद्रे, किरण कटकवार, अप्पु सांडे, रिक्की शेंद्रे, सफाई कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

