प्रमोद बोपटे
जिल्हा प्रतिनिधी,अकोला
अकोला दि. 25 सप्टेंबर :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ] नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला तर्फे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात कमी खर्चात शास्त्रोक्त पध्दतीने हा व्यवसाय कसा करावा यावर विविध विषयतज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन पशुतज्ञ डॉ. शैलेश मदने यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक, बेरोजगार युवक-युवती, नवोद्योजक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तसेच प्रशिक्षणासंबंधी 9552794560 किंवा 9860365002 डॉ. दिलीप बदुकले यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.