अशोक इंगळे शहर प्रतिनिधी लोणार दिनांक 26 सप्टेंबर
सध्या जगात कोरोना ने धुमाकूळ घातल्यामुळे त्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने हाती घेतलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस दिनांक 18 सप्टेंबर पासून लोणार शहरात लोणार नगर नगरपालिकेकडून सर्वेक्षणात सुरुवात करण्यात आली आहे
यामध्ये आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका शिक्षक नगरपालिकेचे कर्मचारी यांचा समावेश असून शहरात 10 टीम कार्यरत आहेत या पथकामध्ये वैशाली पाडळे अशोक मोरे शेख इस्माईल सर नलिनी मोरे यांचा समावेश आहे घरोघरी जाऊन शारीरिक टेंपरेचर व इतर तपासणी माक्स चा वापर करणे साबणाने स्वच्छ हात धुणे शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करणे covid 19 बद्दल नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे
तरी नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे नगराध्यक्षा पुनम ताई पाटोळे उपनगराध्यक्ष बादशहा सेठ सर्व नगरसेविका नगरसेवक बांधव यांनी केले आहे