राम भोस्तेकर
कोकण उपसंपादक रायगड
चक्रिवादळाने रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संदर्भात पोल्ट्री व्यावसायिकांनी खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडल्या. शेडचे, पक्ष्यांचे झालेले नुकसान, तसेच पोल्ट्री व्यावसायिकांना बँकांकडून नाकारण्यात येणारे कर्ज, ग्रामपंचायतीकडून वाढवण्यात आलेला कर अशा अनेक समस्या पोल्ट्री व्यावसायिकांनी मांडल्या.
यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री ना.सुनिल केदार यांच्याशी या संदर्भात सखोल चर्चा झालेली असून हा मुद्दा मंत्री महोदय यांच्या माध्यमातून मंत्री मंडळात मांडला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. पोल्ट्री व्यवसायाच्या झालेल्या नुकसानीबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना नक्कीच दिलासा दिला जाईल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबतही या विषयावर चर्चा केली असून मंत्रिमंडळात या विषयाला तात्काळ मंजूरी दिली जाईल असा विश्वासही खासदार सुनिल तटकरे यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना दिला.