ताज्या घडामोडी

पातुर शहरात वाहन चालक परवाना कॅम्प ला तालुक्यातील नागरिकांची उत्कृष्ट प्रतिसाद

मोटर सायकल व मोटर कार लायसन्स कॅम्पला १५०० युवकांची हजेरी

किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी पातुर
न्यूज-24 मराठी
पातुर: बाळापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शना मध्ये पातूर शहरांमध्ये व पातूर शहरातील युवक व युवती व पुरुष महिला करिता व तसेच प्रौढ नागरिकांकरिता टू व्हीलर व फोर व्हीलर लायसन कॅम्प पातूर शहरांमध्ये पूजा मोटरबाईकस येथे सोमवारी आयोजन केले होते शिबिराचे उद्घाटक पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे यांनी फित कापुन केले. तालुका प्रमुख रवी मूर्तडकर ,शहर प्रमुख तथा प स सदस्य तथा गट नेते अजय ढोणे , पं स सदस्य अँड सुरज झडपे, गोपाल ढोरे, संतोष घुगे,बबलू बायस, अंबादास देवकर,जि प सदस्य संतोष सरदार, पंजाबराव पवार,अंनंत टाकले,देवलाल डाखोरे, राहुल शेगोकार, शंकर देशमुख, सुभाष राखोंडे, अमोल लांडगे,बालू बगाडे, सलमान पठाण, इम्रान पठाण, किशोर फुलारी आदि उपस्थित होते वाहन परवाना करिता लागत असलेले कागद पत्रे आधार कार्ड,टी, सी,मार्क शीट ,2 पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे दोन हजारांहून अधिक संख्येने दाखल करण्यात आले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close