सतिश मवाळ मेहकर ग्रामीन
अंजनी बु ता.मेहकर येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत विषमुक्त भाजीपाला,फळे आणि अन्नधान्य विक्री केंद्राचा शुभारंभ मिशन चे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते करण्यात आला.येथील केशव पुंड यांनी अंजनी येथे तर भारत लाड यांनी हॉटेल मयुर जवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू करून जनतेच आरोग्य अबाधीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.येणाऱ्या काही दिवसांमध्ये मेहकर येथे देखील विषमुक्त भाजीपाला,फळे,अन्नधान्य देण्याच नियोजन शेंद्रिय शेती मिशन मार्फत शेतकरी करताहेत.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून शासनामार्फत जैविक शेती मिशन विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याकामी आज शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे,मिशनचे सदस्य कुवरसिंह मोहणे सर भक्कमपणे कस्ट घेत आहेत.त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेंद्रिय शेती करणे अपेक्षित आहे.त्यादृष्टीने देऊळगाव माळी येथील शेकऱ्यांना मार्गदर्शन करून तेथेही शेंद्रिय शेती गट स्थापन केला आहे.याच पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रचलित शेती पध्दतीमध्ये बदल करून गावागावामध्ये शेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. यावेळी पंचायत समिती सह्या गटविकास अधिकारी गजानन पाटोळे राजुभाऊ पळसकर सभापती कृषी जि.प.बुलढाणा,अकोला येथील योग प्रशिक्षक अवचार सर,अंत्री देशमुख येथील प्रगतशील शेतकरी मा. बी.के.बापू देशमुख, पातूर तेथील शेतकरी देवीदास धोत्रे यांनी शेंद्रिय शेती विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सिद्धेश्वर पवार,राजेश टाले,बाबूराव नागोलकर तर देऊळगाव माळी येथे व्हि.टी.गाभणे, पुरुषोत्तम भराड,राजेश मगर, नागेश मगर यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
अंजनी येथील बाबुराव नागोलकर, विलास पुंड,तेजराव पाटील जाधव,केशव पुंड,भारत लाड, दत्तात्रय तडस यासह काही शेतकरी शेंद्रिय शेती करताहेत.त्यापैकी केशव पुंड व भारत लाड यांच्या शेतावर भेट दिली असता रासायनिक शेतीवर केल्याजानारा खर्च हा अनावश्यक आणि गंभीर आजाराला निमंत्रण देणारा वाटतो. त्यामुळे आजच्या काळात शेंद्रिय शेती काळाची गरज वाटत आहे.

