संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.29 सप्टेंबर:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी विहीरगाव च्या वतीने पोषण आहार महा निमित्य विविध उपक्रमाचे आयोजन करून साजरा केला.
१सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जातो आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, शाळा स्तरावर राबविण्यात येत आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्या सोबतच, हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक स्वच्छता, पोषण आहाराचे जीवनात महत्त्व अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश आहे. या अभियानांतर्गत कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे गृहभेटी व आणलाईन उपक्रम यावर भर दिला जात आहे.या अभियानादरम्यान पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, अॅनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याची शास्त्रीय पद्धत, शरीराला पोषक आहार, कोरोना काळात घ्यावयाची काळजी , रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढववावी, त्यासाठी कोणता आहार घ्यायचा आदि विषयांवर केंद्रप्रमुख डी. सी. तुळशिकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापकपी.व्ही.सोनवाणे, शिक्षक डी. डी. नागोसे विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना गावात मार्गदर्शन करीत आहेत . गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयींचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. १ सप्टेंबर पासून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. हे अभियान 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. ‘माता व बालकाला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.