ताज्या घडामोडी

जिल्ह्यात ३ व ४ आँक्टोबरला जनता कर्फ्य

विलास केजरकर,जिल्हा प्रतिनिधी भंडारा.

भंडारा, दि.३० सप्टेंबर:- जिल्ह्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनता कर्फ्यू करणे यासंदर्भात खासदार सुनिल मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत दिनांक ३ व ४ ऑक्टोबर २०२० रोज शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
या बैठकीला खा सुनिल मेंढे, प्रदीप पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, बाळा काशिवार, नाना पंचबुद्धे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते, विलास काटेखाये, मोहन सुरकर, विनोद बांते, जॅकी रावलानी, अनिल गायधने, यशवंत सोनकुसरे, तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरात नागरिकांनी जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन परिविक्षाधीन मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close