राम भोस्तेकर
विभागीय उपसंपादक कोकण
रायगड जिल्ह्यातील जनतेसाठी इतर सुविधांसह आरोग्य सेवा अत्याधुनिक तसेच प्रभावी करण्याचा विडा सुनील तटकरे साहेब पालकमंत्री अदिती ताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी उचलला आहे . रायगड जिल्ह्यातील रुग्णांची हेळसांड होऊ या करीता आरोग्य सेवा प्रभावी व अत्याधुनिक अधिकाधिक कशा प्रकारे करता येईल याबद्दल तटकरे कुटुंबीय नेहमीच आढावा घेऊन अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात .श्रीवर्धन म्हसळा येथील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे . विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले .या सुविधेमुळे एकाच वेळी किमान 50 जणांना बेडवरच ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे .आजपर्यत एका वेळी एव्हढ्या संख्येत ऑक्सिजन देण्याची वेळ आलेली नाही परंतु कोरोना सारख्या महामारीत तसेच भविष्यात अशी दुर्दैवी वेळी पडल्यास आरोग्य सेवा सक्षम असावी या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून हि सुविधा सुरु करण्यात आली आहे .या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले कि ,जनतेच्या सेवेसाठी तटकरे कुटुंबीय कटिबद्ध आहोत ,विकास कामांत श्रीवर्धन म्हसळा तालुक्याला झुकते माप देणार .या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक .उपविभागीय अधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी ,मुख्याधिकारी किरण मोरे ,तालुका अध्यक्ष दर्शन विचारे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते . पुढे बोलताना आमदार .अनिकेत तटकरे म्हणाले की या रुग्णालयात 1कोटी रुपयाचे सुसज्ज वातानुकूलित अद्यावत ऑपरेशन थेटर सुरु केले आहे .पालकमंत्री अदिती तटकरे डिजिटल एक्स रे सेवा तसेच कार्डियाक ऍम्ब्युलन्स लोकार्पित केली ,खासदार तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी विविध सुविधा प्राप्त होत असल्याने त्यांचे विशेष आभार .येत्या काही दिवसातच आठवड्यातून एक दिवस रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून सोनोग्राफी सुविधा आठवड्यातून किमान एक दिवस चालू करणार असल्याचे सांगून रुग्णालयात चांगली सेवा मिळली तर आम्ही कायम पाठीशी राहू असे आश्वासित करून कोविड रुग्णाची संख्या कमीच राहो अशी अपेक्षा व्यक्त केली .कोरोना महामारीत काहीजण गांभीर्याने घेत नाहीत याचे दुःख वाटते महागडा गॉगल लावून फिरतील पण 20 रुपयाचा मास्क तोंडाला लावत नाहीत हे खूप विदारक दृश्य काही ठिकाणी पाहायला मिळत आहे .कोविड बाबत खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे ,रुग्णालयासाठी हायफ्लो मशीन देखील देणार असल्याचेसांगितले .सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन सुविधेचे छोट्या छोट्या गोष्टी येथील कर्मचाऱ्यांना शिकणे गरजेचे आहे म्हणजे अडचणी भासणार नाहीत .वेळच्या वेळी मेंटेनन्स करणे गरजेचे आहे .तटकरे कुटुंबीय जनतेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहतील असे सांगितले .आरोग्य सेवा दिवसेंदिवस प्रभावी करीत असल्याने श्रीवर्धन तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून तटकरे कुटुंबियांना जनता धन्यवाद देत आहे
कार्यक्रमापूर्वी आम अनिकेत तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपालिका कार्यालयात विविध कामाचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्या लवकरा लवकर सोडवण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आमदार अनिकेत तटकरे यांनी सूचना केल्या .