ग्यानीवंत गेडाम
तालुका प्रतिनिधी वरोरा
वरोरा-2आक्टो.2020
शासनाने लाखो रुपये खर्च करून तालुकास्तरावर विद्यार्थी तथा वयोवृद्ध तथा ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम, कसरत तथा विविध क्रीडा सरावासाठी, विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुलांची निर्मिती केली परंतु स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वरोरा येथील तालुका क्रीडा संकुल घाणीच्या साम्राज्यात असून त्याच परिस्थितीत सुशिक्षित बेरोजगार तथा विद्यार्थी येथील क्रीडा संकुलात विविध प्रकारचे क्रिडा सराव करत असून त्यांना घाणीचा सामना करावा लागत आहे. वरोरा तालुका क्रीडा संकुल येथे वरोरा शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील मुले व्यायाम तथा विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाकडे धाव घेत असतात परंतु संकुलात घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिक ठिकाणी खराब पाणी साचले असून संपूर्ण परिसर काडीकचरा व गवताने व्यापलेला आहे.त्यामुळे विद्यार्थि तथा नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु याकडे स्थानिक शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असून लोकांनीही क्रीडा संकुलाकडे सरावाला जाण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. अशाही परिस्थितीत काही ग्रामीण भागातील तथा शहरातील सुशिक्षित बेरोजगार मुले क्रीडांगण अभावी त्याचा वापर करीत असून आरोग्याबाबत समस्या निर्माण होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन साफसफाई करू चांगले मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.