संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.4 ऑक्टोबर:-
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या मान्यतेने जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया किसान कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष जीतेश राणे यांनी नवेगावबांध येथील डॉ. देवाजी कापगते यांची अर्जुनीमोरगाव तालुका किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदावर त्यांची फेरनिवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे ,नवेगाव बांध नगर काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विशाखाताई साखरे, कमल जायस्वाल ,जगदीश पवार, संतोष नरुले ,परेश उजवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.