आकाश खिल्लारे
तालुका प्रतिनिधी जिंतूर
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावर असलेल्या एमआयडीसी परिसरातील मंदार पेट्रोल पंपाजवळ आंध्रप्रदेश मालवाहतूक करणारी Ap- 16 -TH – 1487 या वाहनाचे वाहनचालक सूर्यकिरण नागेश राऊत वय 39 वर्ष विजयवाडा होऊन हे लोक जळगाव कडे जात असताना मंदार पेट्रोल पंपाजवळ थांबले असता आराम करण्यासाठी थांबले असता रात्री दोनच्या सुमारास त्यांचा त्यांचा क्लिनर सुभाराव
वय 40 वर्ष यांची प्रकृती खालावली तो खाली येऊन तडफडत असताना सूर्यकिरणांनी ॲम्बुलन्स 108 ला फोन लावला मात्र ॲम्बुलन्स वेळेवर आली नसल्यामुळे या या युवकाचा रात्री चारच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना 31 ऑगस्ट दुपारी च्या सुमारास आली आहे . या प्रकरणात नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक सालार चाऊस तसेच पोलीस अधिकारी दंडगव्हाळ व त्यांचे सहकारी तसेच मंदार पेट्रोल पंपाचे मालक सर्वांनी मिळून सदर प्रत शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी लिहिले असून सदर युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकलेले नाही मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला त्यामुळे जनतेतून आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला जात असल्याचे दिसून येत आहे.

