रोहित कोळसकर
उप शहर प्रतिनिधी पोलादपूर
आज इंदापूर येथे अध्यक्ष गणेश पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलची मिटिंग झाली, यावेळी राज राजापुरकर कोकण निरीक्षक, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ओबीसी सेल यांनी मार्गदर्शन केले, यावेळी उपस्थित अध्यक्ष गणेश पवार, इंदापूर उपसरपंच उदय अधिकारी, राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष काका नवगणे, राष्ट्रवादी युवक सचिव डॉ अनंत खराडे,नाना भौड आदि मान्यवर उपस्थित होते. यामंध्ये ओबीसी विद्यार्थाना शाळा आणि कॉलेज ऍडमिशन फी व जागांमध्ये सवलत मिळावी, नोकरी मध्ये प्राधान्य मिळावे अश्या अनेक मागण्या वर चर्चा झाली.