विवेक चाफेकर तालुका प्रतिनिधी मुरुड जंजिरा
मुरुडच्या सर एस.ए. हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक सुरेश दत्तात्रय उपाध्ये (वय ७८) यांचे आज मुंबईच्या सोमैय्या हॉस्पिटल मध्ये कोरोना उपचारा दरम्यान दुखःद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुरुड सर.एस. ए. हायस्कूल येथे सुरुवातीला शिक्षक म्हणून ते रुजू झाले आणि १९७४ ला त्यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. अत्यंत लोकप्रिय मुख्याध्यापक असा त्यांचा लौकिक होता. त्यांच्या सुमारे २५ वर्षाहून अधिक काळ मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत शाळेची सर्व स्तरावर प्रगती झाली. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, मुलगे अभिजित, विश्वजित, आणि परीवार आहे.

