सागर मूलकला / उपजिल्हाप्रतिनिधी गडचिरोली
भामरागड येते काही दिवसांपूर्वी पर्लकोटा नदीला मोठा पूर येऊन तेथील अनेक कुटुंब उघड्यावर आले होते, अनेक कुटुंबाचे अन्नधान्य सह कपडे सुद्धा ह्या पुरात वाहून गेले होते ह्याची माहिती मिळताच विधानपरिषदेचे आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी तात्काळ भामरागड येतील पूरग्रस्त महिलांना वाटप करण्यासाठी 500 साड्या पाठविले होते, त्या साड्याचें काल भामरागड येते भाजपा तर्फे गडचिरोलीचे आमदार डॉ.देवरावजी होळी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या हस्ते पूरग्रस्त महिलांना वाटप करण्यात आले.ह्यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, विनोद अकंनपल्लीवार,अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, पप्पू मद्दीवार, मुकेश नामेवार,संजय अलोने, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार, श्रीकांत नामनवार सह भामरागड येतील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.