ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी, उदगीर
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रिय उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद उदगीर येथील “आधार” शहरी बेघर निवारा केन्द्रामध्ये जागतीक बेघर दिवसानिमित 10 दिवस विविध उपकर्म व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सातवा दिवस दि.07/10/2020 रोजी खालील विविध सेवा या देव रुपी दुतांनी केला.
1.बेघर बांधवाना कपडे वाटप
2.संपूर्ण निवारा केंद्राची स्वच्छता
3.शहरात विविध ठिकाणी फिरून नवीन बेघर लोकांचा शोध घेऊन त्यांना निवारा केंद्रात दाखल
4.बेघर बांधवाना हॅप्पी लाइफ बद्दल विविध कथा सांगण्यात आले.
5.सार्वजनीक ठिकाणी(बस स्टॅन्ड,रेल्वे स्टेशन,सामान्य रूग्नालय,अडत बाजार)निवारा व बेघर दिवसाचे पॅम्पलेट लावण्यात आले.
या सर्व कामचे नियोजन श्री. लक्ष्मण जाधव सर व विशाल गुडसुरकर सर विभाग नप उदगीर जि.लातूर ने केले.
रोटी कपडा बँक(संस्था) टीम गेल्या काही वर्षापासून मोफत अन्न व निवारा गरजू लोकांना पुरवत असून,कोविड च्या काळात मृत्यू पावलेल्या अनाथ मृतात्म्यास शेवटचा अंतिम विधी हे कुटुंब समजून करत आहेत.माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात रोटी कपडा बँकेच्या कार्याबाबत कौतुक केले होते.
रोटी कपडा बँकेच्या तमाम दुता समोर टीम न्यूज २४ मराठी त्यांच्या या कार्यासाठी नतमस्तक आहे.
गौस शेख सचिव,असद सिद्दीकी,समीर शेख
अब्दुल रहीम शेख,शेख जमील,खुर्शीद आलम,इमरान शेख,अहेमद हिलालपुरे, शेख जावेद समीर,मेहबूब लताफ,अमजद मणियार या अवलियांनी या चळवळीने उदगीरचे नाव हे देशाच्या पंचक्रोशीत नेवून ठेवले आहे.या चळवळीचे अनुकरण फक्त राज्यापुरते मर्यादित न ठेवता कर्नाटका, आंध्रा,तेलंगणा,बिहार अश्या अनेक राज्यात ही सेवा पोहचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.