शिवा मगर
अकोट तालुका प्रतिनिधी
भारतात आताची परस्तीती बगता कोरोना महामारी ने ग्रस्त आहे, या महामारीचा काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे रक्तनदानाची साध्या खूप गरज आहे ही गरज लक्षात घेता अकोट मधे नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ अकोट चा वतीने 31ऑगस्ट ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते शिबिराची सुरुवात बाप्पाच्या आरती पूजन अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले साहेब यांनच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत कुलट, ऋषी हिंगणकार,मंडळाचे कार्यध्यक्ष ऋषीकेश गावंडे, कोषादयक्ष कौस्तुभ खोटरे,सदस्य ऋषभ भाषकर,यश महल्ले, शंतनू ढोले, शिवा गीते,गजू मुराठे,जय भाकरवडे, बंटी कात्रे यावेळी उपस्थित होते.शिबीर सकाळी 10ते सायंकाळी5 पर्यंत चालले,तसेच रक्तदान करताना योग्य ती काळजी आणि सोशल डिस्टनसिंग ठेऊन रक्तदान पार पडले याप्रसंगी अकोला रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य हेते.कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष आकाश रावणकार व उपाध्यक्ष अनिकेत कुलट यांनी केले मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले तसेंच शिबिराला चांगलाच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरात 51 जणांनी केले रक्त दान तसेच मंडळाचे अध्यक्ष आकाश रावनकार यांनी सर्व रक्त दात्त्यांचे आभार मानले व रक्तदान करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. हा उपक्रम पहिल्यांदाच नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने झाला अस कौतुक अकोट पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष महल्ले साहेब यांनी केले अतिशय सुंदर उपक्रम राबहुन गणेशोत्सव साजरा झाला.

