बालाजी पांचाळ , वसमत तालुका प्रतिनिधी
वसमत दिनांक 10 ऑक्टोबर वसमत तालुक्यातील मोठे गाव म्हणून सातेफळ हे गाव ओळखले जाते या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ग्रामीण भागातील लोकांची आरोग्याची व्यवस्था व्हावी म्हणून सातेफळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली परंतु कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागात ही थैमान घातलेले आहे परंतु ग्रामीण भागातल्या लोकांची आरोग्याची व्यवस्था व्हावी म्हणून सातेफळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा रोग्याचा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने सातेफळ येथे संपूर्ण बांधकाम करून उभारण्यात आले आहे परंतु या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन सापडत नाही की काय असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडत आहे कारण शासन ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची खेळ मांडते की काय असाही प्रश्न लोकांच्या समोर उभा राहत आहे जर हे आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर चालू झाले तर ग्रामीण भागातील लोकांची हेळसांड थांबणार आहे व वेळ व पैसाही वाचणार आहे त्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर चालू करण्याची मागणी सातेफळ सह ग्रामीण भागातील सर्व जनतेतून होत आहे याचा शासन दरबारी लवकरात लवकर विचार करून गांभीर्याने नोंद घेण्यात यावी

