सुरज पुरारकर
शहर प्रतिनिधी तळा
दिनांक १० ऑक्टोबर रोजी रायगड भूषण, रायगड जिल्हा नाभिक संघाचे माजी अध्यक्ष व सद्य विश्वस्थ मारुती रामचंद्र शिर्के (गुरुजी ) यांचा वाढदिवस रायगड जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी उत्साहाने साजरा केला. २०१८ सालि शिर्के गुरुजी यांना सामाजिक कार्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त, ११ वर्ष रायगड जिल्हा नाभिक संघाचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कार्य केले. तळा परिसरातील उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्वांचा प्राथमिक आयुष्य घडविण्याचे मोलाचे कार्य शिक्षक म्हणून केले. तळा मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सन २००० साळी निवृत्त झाले. सदर प्रसंगी रायगड जिल्हा नाभिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सुदाम शिंदे, रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिव डॉ. अनंत खराडे, विश्वस्त यशवंत खराडे, कायदेशीर सल्लागार अॅड. विवेक मोरे, विश्वस्त भाऊ पांडे, जिर्णोध्दार समितीचे उपाध्यक्ष रवींद्र देवकर तसेच रोहा तालुक्यातील समाज बांधव, महाड तालुक्यातील दिनेश मोरे व समाज बांधव, माणगाव तालुक्यातील समाज बांधव, तळा तालुक्याचे अध्यक्ष रुपेश साळुंखे व समाज बांधव यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.